मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडे खालील प्रकारचे कागदपत्र असणे आवश्यक आहे

१. आधार कार्ड

या योजनेसाठी अर्ज करताना अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे.

२. अधिवास प्रमाणपत्र

या योजनेसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न – या योजनेसाठी अर्ज करताना लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत

रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)

या योजनेसाठी अर्ज करताना महिलेचे बँक खाते हे आधार सोबत लिंक असावे.  आधारसोबत लिंक असलेल्या खात्यामध्येच या योजनेचे पैसे जमा होणार आहेत

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

 

Leave a Comment