Ladki Bahin Yojana Online Apply : महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत सरकारने ही योजना 28 जून 2024 पासून लागू केली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेत अर्ज करण्याची शेवतीची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप लॉंच केले होते. या ॲपच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. राज्यातील लाखो महिलांनी ह्या ॲपचा उपयोग करून आपले अर्ज ऑनलाईन सादर केलेले आहे राज्य सरकारकडे या योजनेचे २ कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये आलेल्याअर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समिती मार्फत केली जात आहे परंतु काही दिवसापासून नारीशक्ती दूत ॲप मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अर्ज भरताना महिलांना अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व बाबीवर शासनाकडून लक्ष देत सरकार ने या योजनेची ऑफिशिअल वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून Ladki Bahin Yojana Online Apply, Ladki Bahin Yojana Status, Ladki Bahin Yojana Eligibility, Ladki Bahin Yojana Document आपण पाहू शकता. तर आज या योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने 1ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट पोर्टल लॉन्च केले आहे आता राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतात या पोर्टलमध्ये नवीन अर्ज करणे अर्जाची स्थिती तपासणी त्याचप्रमाणे योजनेच्या कागदपत्र संबंधित संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध आहे.
नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तरीही अर्ज सादर करू शकत होत्या परंतु राज्य शासनाकडून अशा अर्जाची पडताळणी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे आता या वेबसाईट माध्यमातून अर्ज करताना महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केला आहे .
Ladki Bahin Yojana Online Apply :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप नुसार अर्ज सादर करावा लागेल.
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल (https://ladakibahin.maharashtra.gov.in/)
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर Login पेज ओपन होईल, तुमच्याकडे लॉगिन यूजर आयडी पासवर्ड नसेल तर
- तुम्हाला खाली दिलेल्या Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
- तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव व काही माहिती आधार प्रमाणे भरायचे आहे
- सर्व माहिती अचूक भरून घेतल्यानंतर Captcha फील करून Sign up या बटणावर क्लिक करा
- तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या.
- यूजरआयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे
- लॉगिन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
- Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे .
- तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल
- अर्जामध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून कागदपत्रे अपलोड करून घ्यावे
- ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यावे आणि आज अर्ज सबमिट करावा
अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकता. अशाच प्रकारच्या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या https://ladkibahinyojna.in/ अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.