मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट :

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे

या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत:

  1. महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  2. राज्यातील महिला त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
  3. राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
  4. महाराष्ट्र राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ति करण्यास चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  5. महाराष्ट्र राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे सुद्धा या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ: 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप या योजनेमध्ये प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटी मार्फत प्रत्येक महिन्याला Rs.1500/-  पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे

महिला व बालविकास विभाग मार्फत राबवली जाणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चा लाभ  कोणा कोणाला मिळणार आहे तर या योजनेचे लाभार्थी जे आहेत ते महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष या वयोगटातील विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता काय आहे? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे लाभ मिळवण्यासाठी ची पात्रता पुढीलप्रमाणे आहे

  1. महिला ही महाराष्ट्र राज्याची राहिवासी आवश्यक आहे
  2. महाराष्ट्र राज्यातील विवाहित /विधवा /घटस्फोटीत /परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असणे आवश्यक आहे.
  3. सदर महिलेची किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल.
  4. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे तरच या योजनेचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. 

या योजनेच्या बाबतीत काही अडचण असल्यास महिला आणि मुली अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 या नंबर वर कॉल करू शकतात. 

अशाप्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे आणि महिलांना सशक्त बनवण्यामध्ये मदत करेल. 

महाराष्ट्र सरकारकडून हे  एक सरानीय पाऊल आहे जे महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्वरूपामध्ये मजबूत बनवण्यासाठी मदत करेल